मद्यपीने केली केळविक्रेत्याला मारहाण; पोलिसांचीही पकडली गचांडी 

Residential photo
Residential photo

नाशिक : वडनेर गेट येथे केळविक्रेत्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली असता, त्याने नकार दिला म्हणून त्यास मारहाण करून त्याच्याकडील 2 हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच केळीचा गाडा उलटा करून नुकसान केले. घटनेची माहिती पोलिसांना कळविली असता, आलेल्या पोलिसांचीही गचांडी पकडून त्यांनाही दमदाटी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संशयिताविरोधात दरोडा, विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 
 
सुनील राजाराम सोनवणे (45, रा. पिंपळगाव खांब, वडनेररोड), मंगेळ मंगल माळी (रा. पिंपळगाव खांब) असे दोघा संशयितांची नाव आहेत. वडनेर गेटजवळ संजय ठाकूर यांचा केळी, सफरचंद विक्रीचा गाडा आहे. बुधवारी (ता.4) सकाळी 9 वाजेच्या सुमारास संशयित सुनील सोनवणे त्याठिकाणी आला आणि त्याने केळविक्रेत्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली असता, त्याने नकार दिला. त्याचा राग मनात धरून त्याने दमदाटी केली आणि निघून गेला. मात्र तो दोघा साथीदारांना घेऊन परत आला आणि केळविक्रेत्याकडे पुन्हा दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. पैसे न दिल्याने त्याने केळविक्रेत्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण सुरू केली. तसेच मालविक्रीेचे 2 हजार रुपये बळजबरीेने हिसकावून घेतले. केळी-सफरचंदाचा गाडा उलटापालटा करून नुकसान केले. केळविक्रेत्याची मुलगी मदतीला आली असता, तिचीही साडी ओढून हात धरला आणि लज्जास्पद कृत्य केले. 
सदरची घटनेची माहिती उपनगर पोलिसांना कळविण्यात आली असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक खडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत महादू काकड, गिते, दावले यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. सहाय्यक उपनिरीक्षक काकड यांनी संशयित सोनवणे यास ताब्यात घेतले असता, त्याचा राग येऊन संशयिताने काकड यांचीच गचांडी पकडून शिवीगाळ सुरू केली. तसेच, पोलीस ठाण्यात विष पिऊन पोलिसांची नोकरी घालवितो अशी दमदाटी केली. याप्रकरणी काकड यांच्या फिर्यादीनुसार, सरकारी कामात अडथळा आणल्याचा तर, केळविक्रेत्या ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार, दरोडा, विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com