विवाहबाह्य संबंधाला विरोध केला म्हणून विवाहितेचा छळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नाशिक  : पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्याने पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार, तिचे माहेर नाशिकमध्ये असून 2016 मध्ये तिचा विवाह संशयित पती भिमराव तिराजी पाईकराव (37, रा. सोरजाणा, ता. परतूर, जि. जालना) याच्याशी झाला होता. त्यानंतर ती सोरजाणा येथे नांदण्यास गेली असता, यादरम्यान संशयित पती भीमराव याचे विवाहबाह्य संबंध होते. त्यास विवाहितेने विरोध केला तर, सासरच्यांनीही तिला पाठींबा देण्याऐवजी संशयिताला पाठबळ दिले. तसेच, या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ, दमाटी करण्यात येऊन सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला.

नाशिक  : पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्याने पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार, तिचे माहेर नाशिकमध्ये असून 2016 मध्ये तिचा विवाह संशयित पती भिमराव तिराजी पाईकराव (37, रा. सोरजाणा, ता. परतूर, जि. जालना) याच्याशी झाला होता. त्यानंतर ती सोरजाणा येथे नांदण्यास गेली असता, यादरम्यान संशयित पती भीमराव याचे विवाहबाह्य संबंध होते. त्यास विवाहितेने विरोध केला तर, सासरच्यांनीही तिला पाठींबा देण्याऐवजी संशयिताला पाठबळ दिले. तसेच, या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ, दमाटी करण्यात येऊन सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात संशयित पती भीमराव, सासरा तिराजी सटवजी पाईकराव (55), नंदोई रघुनाथ दादाराव वाघमारे, एकनाथ दादाराव वाघमारे (सर्व रा. सोयजाणा) यांच्याविरोधात विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews

टॅग्स