आडगावचे पोलीस निरीक्षक मोरे यांची तडकाफडकी बदली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

आयुक्तांची कारवाई : औरंगाबाद येथील लाचप्रकरणाचा ठपका 

नाशिक : महिनाभरापूर्वीच आडगाव पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर, आर्थिक गुन्हेशाखेतील पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यावर आडगावची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबाद येथे गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या आडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली होती. या प्रकरणाचा ठपका किशोर मोरे यांच्यावर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. 

पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांची महिनाभरपूर्वी गंगापूर पोलीस ठाण्यातून आडगाव पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी आडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक औरंगाबाद येथे घरफोडीतील एका गुन्ह्याच्या तपासासाठी गेले होते. त्यावेळी संशयिताला दुसऱ्या गुन्ह्यात न अडकविण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याप्रकरणी कारवाई करीत, लाचेची रक्कम स्वीकारताना या पथकाला रंगेहाथ लाच अटक केली होती. 
याच प्रकरणाचा ठपका किशोर मोरे यांच्यावर ठेवला गेल्याचे समजते. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या खात्याअंतर्गत चौकशीत तथ्य आढळून आल्यामुळे त्यांची थेट तक्रार निवारण केंद्रात बदली केल्याचे बोलले जाते. किशोर मोरे यांची बदली ही प्रशासकीय कारणास्तव केल्याचे बोलले जात असले, तरी लाचप्रकरणाचा ठपका त्यांच्या बदलीस कारणीभूत आहे अशीच चर्चा पोलीस वर्तुळात आहे. दरम्यान लाचप्रकरणातील उपनिरीक्षक व तीन पोलीस कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात निलंबित करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews