रिक्षात करंट उतरून चालकाचा दुर्दैवी मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पावसामुळे रोहित्रातील वीजप्रवाह उतरून घडली घटना 

नाशिक : अंबड लिंक रोडवरील लक्ष्मीनगर येथे विजेच्या रोहित्राच्या जोडणीपर्यंत पावसाचे पाणी गेले. त्यामुळे जवळच थांबलेल्या रिक्षाचा रोहित्राचा विजेचा प्रवाह उतरला आणि रिक्षात बसलेल्या चालकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. दानिश अहमद शेख (25, रा. वडाळागाव) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, वडाळागावातून प्रवासी घेऊन दानिश शेख अंबड गावातील लक्ष्मीनगर येथे गेला होता. प्रवासी सोडल्यानंतर दानिश लक्ष्मीनगर येथील रिक्षाथांब्याजवळ प्रवाशाच्या प्रतिक्षेत थांबला. दरम्यान, चार वाजेपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे दानिश रिक्षामध्येच बसून होता. रस्त्यालगतच वीज वितरण कंपनीचे रोहित्र होते. मुसळधार पाऊस असल्याने पावसाचे पाणी रोहित्राच्या जोडणीपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे विजेचा प्रवाह पाण्यातून थेट रिक्षात उतरला. रिक्षातच दानिश बसलेला असताना त्याला जोरदार विजेचा धक्का बसल्याने तो जागीच बेशुद्ध झाला. सदरची काही रिक्षाचालकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्‌यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. दानिश मृत झाल्याची माहिती मिळताच वडाळागावातील नातलगांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटूंबिय व नातलगांना धक्का बसला. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews