Residential photo
Residential photo

स्मार्टरोडवरील गतीरोधकाने प्रवाशाच्या मणक्‍याला त्रास 

नाशिक : स्मार्ट रोडवरील गतीरोधकामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या 50 वर्षीय इसमाच्या पाठीच्या मणक्‍याला इजा पोहोचली आहे. स्मार्ट रोडच्या कामकाजावरून आधीच तक्रारी असताना, त्यात आणखी भर पडली आहे. 
 
जयंत कमलाकर लोणकर (50, रा. नाशिकरोड) असे प्रवासी इसमाचे नाव आहे. जयंत लोणकर हे महामार्ग बसस्थानकावरून पुणे-बडोदा या बसमध्ये (एमएच 12 सीएच 4920) दुपारी एक वाजेच्या सुमारास बसले. त्यानंतर सदरची बस सीबीएस मार्गे अशोकस्तंभकडे जात असताना, न्यायालयासमोरील स्मार्ट रोडवरील गतीरोधकावरून बस गेली. त्यावेळी बस त्या गतीरोधकावरून जाताना आदळली. त्याचा झटका जयंत लोणकर यांना बसला आणि त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या पाठीच्या मणक्‍याला झाला. पाठीच्या मणक्‍याला बसलेल्या झटक्‍यामुळे ते विव्हळले. त्यांना यातना होऊ लागल्याने बसचालक बबन बाजीराव मगर यांनी बस प्रवाशांसह जिल्हा रुग्णालयात आणली. त्याठिकाणी जयंत लोणकर यांना दाखल करण्यात आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 
दरम्यान, त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या स्मार्टरोडच्या कामकाजाबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाही त्याकडे ठेकेदार आणि प्रकल्पाधिकाऱ्यांकडून सोयीस्कररित्या दूर्लक्ष होते आहे. गणेशोत्सव काळातच या मार्गावरील गतीरोधकांच्या अतिरिक्त चढावाकडे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु अद्यापही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने, आज बसमधील प्रवाशाच्याच मणक्‍यांना त्रास झाल्याची घटना घडली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com