वृद्धाच्या खिशातील सोन्याच्या बांगड्या चोरीला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिक : रविवार कारंजा येथून नाशिकरोडकडे जाणाऱ्या शहर बसमध्ये गर्दीची संधी साधून अज्ञात चोरट्याने वृद्धाच्या खिशातील 5 तोळे सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना घडली. यशवंत सहादू गवळी (76, रा. वावी, ता. सिन्नर, जि.नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी (ता.8) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ते रविवार कारंजा येथून निमाणीकडून नाशिकरोडकडे जाणाऱ्या शहर बसमध्ये ते चढले. यावेळी बसमध्ये गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत, अज्ञात संशयितांनी यशवंत गवळी यांच्या पायजम्याच्या खिशातील 5 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : रविवार कारंजा येथून नाशिकरोडकडे जाणाऱ्या शहर बसमध्ये गर्दीची संधी साधून अज्ञात चोरट्याने वृद्धाच्या खिशातील 5 तोळे सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना घडली. यशवंत सहादू गवळी (76, रा. वावी, ता. सिन्नर, जि.नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी (ता.8) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ते रविवार कारंजा येथून निमाणीकडून नाशिकरोडकडे जाणाऱ्या शहर बसमध्ये ते चढले. यावेळी बसमध्ये गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत, अज्ञात संशयितांनी यशवंत गवळी यांच्या पायजम्याच्या खिशातील 5 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार एन.व्ही. कुंदे हे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews

टॅग्स