स्लिप भरण्याच्या बहाण्याने केले 50 हजार लंपास 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नाशिक : नाशिकरोडच्या स्टेट बॅंकेच्या शाखेत स्लीप भरून देण्याचा बहाणा करून दोघांनी एकाचे 50 हजार रुपये हातोहात लंपास केल्याचा प्रकार घडला. हरिष बाळासाहेब बिडगर (रा. जाचक मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी (ता.9) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते दूर्गा गार्डनसमोरून एसबीआय बॅंकेत 50 हजार रुपये भरण्यासाठी गेले होते. बॅंकेत ते स्लिम भरत असतानाच पाठीमागून दोन संशयित आले आणि त्यांनी त्यांच्याकडे स्लीप भरून देण्याची मदत मागितली.

नाशिक : नाशिकरोडच्या स्टेट बॅंकेच्या शाखेत स्लीप भरून देण्याचा बहाणा करून दोघांनी एकाचे 50 हजार रुपये हातोहात लंपास केल्याचा प्रकार घडला. हरिष बाळासाहेब बिडगर (रा. जाचक मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी (ता.9) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते दूर्गा गार्डनसमोरून एसबीआय बॅंकेत 50 हजार रुपये भरण्यासाठी गेले होते. बॅंकेत ते स्लिम भरत असतानाच पाठीमागून दोन संशयित आले आणि त्यांनी त्यांच्याकडे स्लीप भरून देण्याची मदत मागितली. त्यावेळी संशयितांनी बिडगर यांना बॅंकेच्या बाहेर आणले आणि विश्‍वासात घेऊन ते स्लिप करीत असताना, संशयितांनी बिडगर यांच्याकडील रक्कम स्वत:कडे घेत हातोहात ते लंपास केले अिाण कागदाचा गठ्ठा त्यांच्या हाती सोपवून पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक उपनिरीक्षक ए.एच. साळवे हे तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews