गुगल पेच्या माध्यमातून फसवणूक 

Residential photo
Residential photo

नाशिक : मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गुगल पेवरून ऑनलाईन व्यवहार करताना, अज्ञात संशयिताने लिंक शेअर केली. त्यात गोपनीय माहिती दिल्याने एकाची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. योगेश आनंदा निकम (रा. कृष्णाजी सोसायटी, पंचवटी कारंजा) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी गेल्या 17 सप्टेंबर रोजी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गुगलवरून गुगल पे कस्टमर केअरवरील क्रमांकवर संपर्क साधला. त्यावेळी अज्ञात संशयिताने त्यांच्या मोबाईलवर लिंक शेअर केली असता, त्यावरील माहिती योगेश निकम यांनी भरली. ही माहिती भरताना बॅंक खात्याची गोपनीय माहितीही त्यात भरली. त्यामुळे अज्ञात संशयिताने त्या आधारे बॅंक खात्यातून पैसे काढून घेत फसवणूक केली. अशाप्रकारे संशयितांनी युपीआय पीन, क्रेडिट कार्ड, ओटीपीच्या माध्यमानू अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com