व्हिलचेअर अभावी दिव्यांगांची कसरत 

live photo
live photo

नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, दिव्यांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये याहेतूने कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र नसावे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअर असावे असे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्येक केंद्रावर व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली असतानाही, पंचवटीतील एका केंद्रावर व्हिलचेअर नसल्याने मतदानासाठी आलेल्या तरुण दिव्यांगाला प्लॅस्टिकच्या खुर्चीवरून मतदान केंद्रात न्यावे लागले. 

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात असलेल्या पंचवटीत सदरचा प्रकार घडला. आयुर्वेदिक महाविद्यालयात मतदान केंद्र होते. आज दुपारच्या सुमारास दोन्ही पायांची अधू असलेला तरुण मतदार प्रताप गुलाबराव देशमुख हे मतदान करण्यासाठी स्वखर्चाने रिक्षा करून आले. दिव्यांग असल्याने त्यांची रिक्षा मतदान केंद्राच्या समोर आली परंतु केंद्रावर दिव्यांगांसाठीची व्हिलचेअर नसल्याने प्रताप यांची एकच पंचाईत झाली. त्यांनी मतदानासाठी आलेल्यांकडे व्हिलचेअरसंदर्भात विचारणा केली परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तेथे बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचाऱ्याने आतून एक प्लॅस्टिकची खुर्ची आणली. एका साथीदाराच्या मदतीने प्रताप यांना रिक्षातून त्या खुर्चीवर बसविले. दोघांनी प्रतापसह खुर्ची उचलून आत नेली. प्रताप यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पुन्हा त्याच खुर्चीवर बसवून प्रताप यांना रिक्षापर्यंत आणले आणि निघून गेला. 
परंतु, या घटनेमुळे शहरातील बहुतांश मतदान केंद्रावर व्हिलचेअर नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ वा दिव्यांगांना मनस्ताप सहन करावा लागला असावा. 

सेल्फी पॉईंटबाबत दुजाभाव 
मतदानासंदर्भात प्रबोधन व्हावे व प्रोत्साहन मिळाले या हेतूने शहरातील बहुतांश मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केल्यानंतर सेल्फी काढण्यासाठीचा सेल्फी पॉईंट करण्यात आले होते. त्यामुळे अनेक तरुण मतदानांनंतर त्याठिकाणी सेल्फी काढत होते. परंतु हे सेल्फी पॉईंट मध्यम वा उच्च वर्गीय परिसरातील मतदान केंद्रांवरच असल्याचे निदर्शनास आले. याउलट झोपडपटटी परिसरात असलेल्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी असे सेल्फी पॉईंट ठेवण्यात आलेले नव्हते. त्यामुळे जेव्हा सोशल मीडियावर सेल्फी पॉईंट सोबतचे मतदान केल्याचे छायाचित्र झळकू लागल्यानंतर ज्या ठिकाणी ही सुविधा नव्हती, त्याठिकाणच्या मतदारांमध्ये करण्यात आलेल्या दुजाभावाबाबत नाराजी व्यक्त केली गेली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com