आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात ना वाहतुकीचा अडथळा, ना फेरीवाल्यांचा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलीस आयुक्तांनी केली पाहणी 

नाशिक : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर एरवी अस्थाव्यस्थ थांबलेले रिक्षाचालक अन्‌ रस्त्यांमध्ये फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्यांना पायी चालणे मुश्‍किल होते. आज त्याच मार्गाची पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पाहणी केली असता, सारे काही सुरळीत असल्याचा भलताच "देखावा' त्यांच्यासमोर सादर करण्यात आला. दूधबाजारात ना वाहतूक खोळंबली, मेनरोडवर फेरवालेच नव्हते, तर एरवी वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या एम.जी.रोडवर वाहनेच नव्हती. एवढेच नव्हे, कपालेश्‍वर मंदिरासमोर आज भिकारीही नव्हते. 

येत्या गुरुवारी (ता.12) अनंत चतुर्दशी असल्याने लाडक्‍या गणपती बाप्पाला वाजतगाजत निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे आज पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, महापालिकेचे अधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुक मार्गाची पाहणी केली. मिरवणुक पाहण्यासाठी नाशिककरांची मिरवणुक मार्गाच्या दुतर्फा गर्दी असते. यात कोणत्याही अनुचित घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, मिरवणुक पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण, मिरवणुक मार्गावरील अडचणी, अडथळे, सुरक्षा, बंदोबस्त या अनुषगांने पोलीस आयुक्तांनी मार्गाची पाहणी करीत, ठिकठिकाणी माहिती घेत काही सूचनाही केल्या. 
वाकडी बारव येथून पाहणी दौऱ्यास प्रारंभ होऊन दुधबाजार, चौक मंडई, गाडगे महाराज चौक, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, होळकर पुल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविया चौक, शनिचौक, कपालेश्‍वर मंदिर, सांडवा देवी, गोदाघाट अशा या मार्गाची पाहणी केली. 
दौऱ्यादरम्यान आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे सुनील बागुल, गटनेते सतीश कुलकर्णी, शहर गणपती महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांचाही सहभाग होता. तसेच, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे, गुन्हेशाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहायक आयुक्त अशोक नखाते, अनिरूद्ध आढाव, प्रदीप जाधव, मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, हेमंत सोमवंशी, के.डी. पाटील, अशोक भगत, फुलदास भोये यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 
 
या केल्या सूचना 
* महापालिकेच्या माध्यमातून मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार 
* ठिकठिकाणी वॉच मनोरे उभारले जाणार 
* पारंपारिक वाद्यांनाच परवानगी; डीजे वाजविला तर गुन्हे दाखल होणार 
* गणेश मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन 

मिरवणूक मार्गावरील खड्डे, विद्युत तारा, पडकेवाडे, धार्मिक स्थळे, जोडरस्ते, वाहतुक याचा सविस्तर आढावा घेत काही सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikganpatinews