शहरभर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन 

Residential photo
Residential photo

नाशिक : विधान सभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये सोमवारी रात्रीपासून ते आज (ता.8) पहाटेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील 87 गुन्हेगारांची धरपकड केली. दरम्यान, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गस्ती पथकाकडून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. 

विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची लढत स्पष्ट झाली आहे. त्यामुळे, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.7) रात्री दहा वाजेपासून शहर-परिसरात ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. सदरचे कोंम्बिंग ऑपरेशन आज (ता.8) पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होते. यादरम्यान, आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन पोलिसांनी 87 गुन्हेगारांची धरपकड केली. 
शहरातील नांदुरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळगाव, राऊ हॉटेल, अंबड टी पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायणबापू नगर, पाथर्डी फाटा, संसरी नाका, फुलेनगर, पंचवटी, वाघाडी, मल्हारखाण झोपडपट्टी, सातपूर गाव या ठिकाणी रात्रभर पोलिसांनी गुन्हेगारांची शोध मोहिमेची कारवाई केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह, तडीपार तपासणी, हॉटेल, लॉजेस तपासण्यात आले. यावेळी शहराच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली. रेकॉर्डवरील 102 सराईत गुन्हेगारांचा शोध घेत 87 गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 82 हॉटेल्स व ढाब्याची तपासणी करीत 48 जणांविरुद्ध मुंबई पोलिस ऍक्‍टनुसार कारवाई करण्यात आली. नाकाबंदीमध्ये 340 वाहनांची तपासणी करण्यात येऊन 51 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत, 10 हजार 100 रुपयांचा दंड वसुल केला. त्याचप्रमाणे, शहरात ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत 96 टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. तर नाकाबंदीदरम्यान, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 6 वाहनचालकांविरोधात ड्रंक ऍण्ड ड्राईव्हनुसार कारवाई करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com