हरियाणातून चौथ्या संशयिताला अटक 

Residential photo
Residential photo

मुथूट फायनान्स दरोडा प्रकरण  : दरोडोखोरांना दिला होता आश्रय 
 
नाशिक : उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात संशयितांना आश्रय देणारा आणि घटनेच्या दिवशी उत्तर भारतात पसार झालेल्या संशयिताला गुन्हेशाखेने अटक केली आहे. सुभाष गौड असे संशयिताचे नाव असून त्यास हरियाणात अटक जेरबंद करण्यात आले आहे. यापूर्वीही संशयिताने पोलिसांना चकविले होते. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तसेच, या कटाचा मुख्य सूत्रधार सुबोद रॉय बिहारच्या कारागृहात असून त्याचा ताबा घेण्यासाठी नाशिक पोलीसांकडून प्रयत्न सुरू आहेत. 

गेल्या 14 जून रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास सहा संशयित दरोडेखोरोंनी मुथून फायनान्स कार्यालयावर सशस्त्र दरोड्याची घटना घडली होती. सदरील दरोड्याची उकल नाशिक पोलीसांनी केली असून तिघांना यापूर्वीच अटक केली आहे. सदरच्या गुन्ह्यात सहभागी संशयितांना सुभाष गौड या सातपूर परिसरात राहणाऱ्याने दिला होता. परप्रांतिय असलेला सुभाष गौड हा काही वर्षांपासून सातपूरमधील पांडे चाळीत भाड्याने राहत होता. संशयितांच्या संपर्कात आल्यानंतर सुभाष याने मुथूट फायनान्सची रेकीही केली होती. दरोड्यासाठी आलेल्या संशयितांना त्यानेच आश्रय दिला होता. संशयितांच्या येण्यावरून त्याचे आणि चाळमालक पांडे यांच्याशी वादही झाला होता. 
14 जून रोजी दरोड्याचे निश्‍चित झाले असता, त्याच दिवशी सकाळी तो कुटूंबियांसह उत्तर भारतात पसार झाला होता. त्याच्या मागावर गुन्हेशाखेचे पथकही रवाना झाले होते. संशयिता आकाशसिंह याने त्याला एका ठिकाणी कामाला लावून दिले होते. परंतु पोलीस आल्याची कुणकुण लागताच तो पसार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेरिस तो हरियाणाता असल्याचे समजताच गुन्हेशाखेच्या युनिट एकाच्या पथकाने त्यास अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वीच आकाश सिंग, जितेंद्र सिंग राजपूत, परमेंदर सिंग या तिघांना अटक केली असून, सध्या ते नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. मुथूट फायनान्सच्या दरोड्यात दरोडेखोरांना सॅज्यु सॅम्युअल यांच्या प्रतिकारामुळे अपयश आले होते. मात्र या घटनेत सॅम्युअल यांच्यावर दरोडेखोरांनी गोळ्या झाडून हत्त्या केली होती. नाशिक पोलिसांनी अत्यंत शिताफीने गुन्ह्याची उकल केली होती. या कटामागे कुख्यात सुबोध रॉय असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
 
सुबोधच्या ताब्यासाठी प्रयत्न 
ज्वेलरी फायनान्सचे कार्यालयांची लुट करणारा कुख्यात सुबोध रॉय सध्या बिहारच्या कारागृहात आहे. परंतु त्यानेच कारागृहातून नाशिकच्या उंटवाडीतील मुथूट फायनान्स दरोड्याचा कट रचला होता. यासाठी 11 संशयितांची जमवाजमव केली होती. दरोडा अपयशी ठरला आणि पोलिसांनीही गुन्ह्याची उकल कली. या कटाचा मुख्यसूत्रधार सुबोध रॉय याचा ताबा घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी बिहार पोलीसांशी प्रयत्न सुरू आहेत. तसेच याप्रकरणी नाशिक पोलिसांकडून मोक्काअन्वये कारवाई केली जाणार आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com