तपोवनात पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

कॉलनी रस्ते बॅरिकेटिंग करून बंद 

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या गुरुवारी नाशिकमध्ये जाहीर सभा होते आहे. ही सभा तपोवनातील साधुग्राम मैदानावर होते आहे. या मैदानावर सध्या मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शहर पोलिसांनी परिसराचा ताबा घेतला आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सभास्थळाची पाहणी करीत पोलिसांनी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. मैदानाकडे येणारे कॉलनी रस्ते बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अतिमहत्त्वाचे राजकीय नेत्याच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (ता.19) दुपारी तपोवनातील साधुग्राम मैदानावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे- पाटील, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, गुन्हेशाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.16) साधुग्राम मैदानाची पाहणी केली. प्रत्यक्ष सभास्थळाची पाहणी करीत, पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे- पाटील यांनी कडेकोट बंदोबस्ताच्या सूचना केल्या. 
मैदानाकडे जाणाऱ्या कॉलनी रस्त्यांवर बॅरिकेटिंग करून ते अडविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, मुख्य सभामंडपाकडे येणारा मार्ग फक्त अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी असल्याने आतापासूनच याठिकाणी पोलीसांची छावणी उभारण्यात येऊन येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. मंडपाचा सामान ने- आण करणाऱ्या वाहनांचाच या मार्गाने प्रवेश दिला जात असून अन्य वाहनांना बाहेरच पार्किग करण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत. तपोवन रस्त्याकडून सर्वसामान्यांना सभास्थळी येता येणार आहे. त्याठिकाणीही पोलिसांकडून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. पोलिसांकडून आत्तापासून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून रात्रदिंवस याठिकाणी पोलीसांचा जागता खडा पहारा असणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikPMsabhapolicenews