नाशिक आयुक्तालय हद्दीत ड्रोनच्या उड्डाणावर बंदी 

Residential photo
Residential photo

पंतप्रधान दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून कलम 144 लागू 


नाशिक : येत्या आठवड्यात नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे आहेत. त्यामुळे या व्यक्तींच्या सुरक्षात्मक उपाययोजनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून आयुक्तालय हद्दीमध्ये खबरदारी म्हणून ड्रोन्स वा तत्सम हवाई साधनांच्या उड्डाणावर कलम 144 अन्वये बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन्स वा तत्सम हवाई साधनांचा वापर केल्यास अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर पोलीसांकडून देण्यात आला आहे. 

येत्या आठवड्यातील बुधवारी (ता.18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरातून उघड्या वाहनातून फेरी आहे तर, गुरुवारी (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचवटीतील तपोवनात जाहीर सभा आहे. यापार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षाव्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे. याच पार्श्‍वभूमीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारीच्या उपाययोजना पोलिसांनी अंमलात आणल्या आहेत. त्यानुसार, येत्या 20 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत शहर हद्दीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलेले आहे. त्यानुसार, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅंग ग्लायडर्स, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, हॉटएअर बलुन्स, प्रायव्हेट हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्स यासह तत्सम हवाई साधनांपासून नाशिक दौऱ्यावर येणाऱ्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवितांस संभाव्य धोका उत्पन्न होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या हवाई साधनांवर सीआरपीसी कलम 144 अन्वये 20 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. शहरातील निषिद्ध क्षेत्र, हेलिपॅड, सभेचा ठिकाण, संवेदनशिल ठिकाणांवरही अशा हवाई साधनांना बंदी असल्याचे आदेश पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिले आहेत. 

पूर्वपरवानगी आवश्‍यक 
बंदी दरम्यान, एखाद्या व्यक्तीस, खासगी संस्था, शासकीय अस्थापना यांना ड्रोनद्वारे चित्रीकरण करावयाचे असल्यास त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे. विनापरवानगी ड्रोन व तत्सम हवाई साधनांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- लक्ष्मीकांत पाटील, उपायुक्त, गुन्हेशाखा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com