esakal | मैत्रिणीच्या भावानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

मैत्रिणीच्या भावानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक-पुणा महामार्गावरील शिवाजीनगर येथे घरी सोडण्याच्या बहाण्याने मैत्रिणीच्याच भावाने ÷अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित अक्षय चौधरी (रा. पंचशिलनगर, शिवाजीनगर, उपनगर) याच्याविरोधात पोस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अल्पवयीन पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित मुलगी ही गेल्या सोमवारी (ता.2) पंचशीलनगरमधील तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेली होती. रात्री 9 वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही तिच्या घरी जाण्यासाठी निघाली. तेव्हा मैत्रिणीचा संशयित भाऊ अक्षय याने तिला घरी सोडवायला येतो म्हणून निघाला. त्यावेळी त्याने त्याच्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या खोलीत पीडितेला नेले. दाराला आतून कडी लावून त्याने दमदाटी करीत पीडितेला तिच्या अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने सदरचा प्रकार कोणाला सांगितल्यास, तुला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी उपनगर पोलिसात बाल अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को) आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास महिला उपनिरीक्षक जाधव या करीत आहेत. 

loading image
go to top