परप्रांतिय अधिकाऱ्यांकडून "मराठा' उमेदवारांची छळवणूक 

परप्रांतिय अधिकाऱ्यांकडून "मराठा' उमेदवारांची छळवणूक 

नाशिक: स्टाफ सिलेक्‍शन भरती प्रक्रियेअंतर्गत सामनगाव येथील आरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू आहे. या चाचणीमध्ये अर्धसैनिक बलाच्या परप्रांतिय अधिकाऱ्यांसमोर मराठा उमेदवार छातीचे मोजमाफ घेण्यासाठी आला तर, अक्षरश: मोजमापाचा टेप तुटेपर्यंत ताणून माप घेतले जात आहे. या पूर्वग्रहदूषितपणातून मराठा उमेदवारांना सर्रासपणे बाद ठरविण्याचा एककल्ली कार्यक्रम सुरू असून, नोकरीच्या आशेने आलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांना मात्र रडू कोसळते आहे. तर त्याचवेळी परप्रांतिया उमेदवारांची कुवत नसताना त्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी रवाना केले जात असल्याचा दुजाभावही सुरू आहे. 

गेल्या 13 तारखेपासून राज्यातील नाशिकसह नागपूर, पुणे आणि मुंबई या केंद्रावर स्टाफ सिलेक्‍शन भरतीची शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातून सुमारे 24 ते 26 हजार तर देशभरातून 58 हजार जागा अर्धसैनिक बलात कॉन्स्टेबल म्हणून भरती केले जाणार आहे. त्यासाठीची लेखी परीक्षा आणि धावणे व उंचीची शारीरिक प्रक्रियाही पार झाली आहे. तर सध्या या चारही केंद्रावर छाती मोजण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
त्याअंतर्गतच नाशिकरोडच्या सामनगाव येथील आरपीएफ ट्रेनिंग सेंटरच्या प्रांगणामध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीतील अखेरच्या टप्प्यातील छाती मोजमापाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी दररोज 350 उमेदवारांना पाचारण करण्यात आलेले आहे. अर्धसैनिक बलातील परप्रांतिय अधिकारी आलेल्या उमेदवारांच्या छातीची मोजमाप घेत आहेत. मात्र ज्यावेळी उमेदवार याचे कागदपत्रे घेऊन संबंधित अधिकाऱ्यासमोर जातात, त्यावेळी परप्रांतिय अधिकारी कागदपत्रावरील "मराठा' उमेदवारांसाठीचे डी सर्टिफिकेट पाहाताच त्यांच्या छाती टेपने मोजताना अक्षरश: छळच करीत आहेत. टेप छातीच्या खाली लावला जातो. ज्यामुळे निर्धारित 78 ते 83 सें.मी. पेक्षाही कमी माप घेऊन बाद ठरविले जाते आहे. त्याचप्रमाणे छाती फुगवून माप घेताना मात्र तोच टेप अत्यंत सैल सोडला जातो आहे. अशाप्रकारे मराठा उमेदवार छातीच्या मापात फेल दाखविण्याचा प्रकार परप्रांतिय अधिकाऱ्यांकडून केला असल्याचा आरोप राज्यभरातून आलेल्या मराठी उमेदवारांनी केला आहे. 

परप्रांतिय उमेदवारांना वेगळा न्याय 
मात्र, त्याचवेळी परप्रांतिय उमेदवाराचे छातीचे माप घेताना त्याच परप्रांतिया अधिकाऱ्यांकडून झुकते माप दिले जात आहे. परप्रांतिय उमेदवाराची छाती भरत नसली तरीही त्यास उत्तीर्ण केले जात आहे. मराठी उमेदवाराने त्याबाबत विचारणा केली असता, त्यांना मारहाण करण्यात आल्याचाही मुजोरपणा परप्रांतिय अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या मराठा उमेदवारांना त्रास सहन करावा लागतो आहे. 

टेप तुटेपर्यंत ताणून माप घेतले. अनेक टेप परप्रांतिय अधिकाऱ्यांनी तोडले. मनात आकस ठेवून अधिकारी मराठा तरुणांना बाहेर काढत आहेत आणि परप्रांतिय उमेदवारांना उत्तीर्ण करीत आहेत. हा मराठी तरुणांवर अन्याय आहे. त्याठिकाणी बाहेरच्या कोणालाही येऊ दिले जात नाही. असा प्रकार नाशिक वगळता अन्य कोणत्याही सेंटरवर नाही. 
- एक मराठा उमेदवार. 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com