पतीच्या त्रासाला कंटाळून करणार होती आत्महत्त्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

निर्भया पथकाने ताब्यात घेत केले वात्सलयात दाखल 

नाशिक : अवघ्या आठवडाभरापूर्वीच घटस्फोट झाल्यानंतरही पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून आत्महत्त्येच्या उद्देशाने नाशिकला आलेल्या 25 वर्षी विवाहितेला नाशिक पोलिसांच्या निर्भया पथकाने वेळीच आधार दिला. माहेरीही जाण्यास नकार दिल्याने अखेर तिला महिलांच्या वात्सलयात दाखल करण्यात आले आहे. तर, दुसऱ्या एका घटनेमध्ये वृद्ध दाम्पत्याचा छळ करणाऱ्या सूनेलाही निर्भया पथकाने वठणीवर आणले. 

तुळजा हिरामण भोये (25, रा. कळंबा, ता. सुरगाणा, जि. नाशिक) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. लग्न झाल्यापासून तिला तिच्या नवऱ्याकडून मारहाण होत होती. या सततच्या छळाला कंटाळून तिने न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला होता. आठवडाभरापूर्वीच तिचा घटस्फोट झाला. मात्र तरीही तिच्या नवऱ्याकडून तिला बेदम मारहाण आणि छळ करण्यात आल्याने, बुधवारी (ता.30) तुळजा हिने आत्महत्त्या करण्याच्या उद्देशाने नाशिक गाठले. ठक्कर बाजार बसस्थानक येथे सायंकाळी पोहोचली. बेदरलेल्या अवस्थेमध्ये तिने बसस्थानकामध्येच झोपून राहिली. आज सकाळी ती बसस्थानक आवारात कावरीबावरी होऊन फिरत होती. संशयास्पदरित्या तिची वर्तणूक पाहून तेथील पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्याने निर्भया पथकाला कॉल केला. 
निर्भया पथकातील महिला उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या पथकाने तिला ताब्यात घेत सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणले. तुळजाने तिची हकिकत सांगितल्यानंतर पोलिसांनी तिला तिच्या माहेरी पोहोच करण्याचे तिला विचारले असता, तिने माहेरी जाण्यास नकार दिला. तुळजाच्या पाच बहिणी असून दोघींचे लग्न व्हायचे आहे. त्यामुळे माहेरचेही तिला पुन्हा तिच्या पतीकडेच रवाना करतील असे तिने सांगितल्याने अखेर महिलांच्या वात्सलयात तिची रवानगी करण्यात आली आहे. सततची मारहाण व मानसिक त्रासामुळे तिच्यावर मानसिक ताण आला आहे. निर्भया पथकाने वेळीच तुळजाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. 
दरम्यान, भद्रकाली परिसरातील तांबट लेन येथे एका वृध्द दाम्पत्याला त्यांची सून त्रास देत असल्याची तक्रार निर्भया पथकाकडे आली होती. महिला उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी व त्यांचे पथक सदर ठिकाणी पोहोचले आणि वृध्द दाम्पत्यांची संवाद साधला. त्यानंतर त्यांच्या सुनेला जाब विचारत, पुन्हा त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/women/nirbhaya/crimenews