नवरात्रोत्सवासाठी यात्रोत्सवात निर्भया पथकाकडून निगराणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवी यात्रोत्सव आणि भगूर येथील रेणुका देवी यात्रोत्सवासाठी एक हजार 400 पोलीस कर्मचारी आणि 1 हजार होमगार्डचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याशिवाय, भल्या पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी शहर-परिसरात पायी येणाऱ्या भाविक महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथका सज्ज आहे. तसेच, साध्या वेशातील महिला पोलीस, निर्भया पथकांचीही गस्ती असणार आहे. 

गेल्यावर्षी नवरात्रोत्सवाच्या काळातच सोनसाखळी चोरीच्या घटना मोठ्याप्रमाणात घडल्या होत्या. त्यापार्श्‍वभूमीवर यावेळी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कालिका देवी यात्रोत्सव आणि े रेणुका देवी यात्रोत्सवासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार, परिमंडळ एकमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 510 पोलीस आणि 191 महिला पोलीस, 385 पुरुष होमगार्ड तर 135 महिला होमगार्ड आहेत. परिमंडळ दोनमध्ये 485 पोलीस आणि 345 महिला पोलीस, 305 पुरुष तर 140 महिला होमगार्डचा समावेश आहे. याशिवाय एसआरपीएपच्या दोन तुकड्या, स्ट्राईकिंग फोर्सच्या 6 तुकड्या सज्ज आहेत. 
नाशिक शहराचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवीच्या दर्शनासाठी दिवसांगणिक भाविकांची गर्दी वाढते. त्यामुळे याठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांकडून चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे गर्दीमध्येही साध्या वेशातील पोलिसांसह निर्भया पथकाच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गस्ती असणार आहेत. 

असा आहे बंदोबस्त :
पोलीस निरीक्षक - 23 
उपनिरीक्षक - 88 
पोलीस कर्मचारी (पुरुष) - 995 
पोलीस कर्मचारी (महिला) - 345 
होमगार्ड(पुरुष) - 690 
होमगार्ड (महिला) - 275 
एसआरपीएफ - 2 तुकड्या 
स्ट्राईकिंग फोर्स - 6 तुकड्या 
वाहने - 53 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikyatracrimenews