विजेचा शॉक बसून मुलीचा दुर्दैवी मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नाशिक : खेरवाडी (ता. निफाड) येथे टेबल फॅनची पीन काढताना शॉक बसून 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. दीपाली मोहन पवार (12, रा. चमकनगर, खेरवाडी, ता. निफाड) असे मुलीचे नाव आहे. दीपाली राहत्या घरामध्ये असलेल्या टेबल फॅनचे बटन बंद करून पीन काढत असताना तिला विजेचा जबरदस्त शॉक बसला. तिच्या मानेजवळ जखमही झाली. तिला उपचारासाठी नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करून, अधिक उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सायखेडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashipoliceshok