कर थकबाकीदारांसाठी अभय योजना 

Residencial Photo
Residencial Photo

नाशिक, ता. 21- महापालिकेच्या वतीने घरपट्टी थकबाकीदारांवर दोन टक्के शास्ती आकारली जात आहे परंतू शास्तीची रक्कम भरण्यास थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळतं नसल्याने त्यावरही पालिकेने आता अभय योजना जाहीर केली आहे. योजनेंतर्गत सप्टेंबर अखेर पर्यंत थकबाकी अदा केल्यास दंडाच्या रक्कमेत 75 टक्के तर 10 ऑक्‍टोबर पर्यंत रक्कम अदा केल्यास 50 टक्के व 15 ऑक्‍टोबर पर्यंत थकबाकी अदा केल्यास पंचवीस टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
महापालिकेच्या उत्पन्नाचे स्क्षोत असलेल्या घरपट्टी थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतं असल्याने पालिका प्रशासनाने थकबाकीच्या रक्कमेवर दोन टक्के दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. परंतू दोन टक्के दंडावरून वाद निर्माण होत असून थकबाकीसह दंड अदा करण्यास ग्राहकांकडून नकार मिळतं आहे. पालिकेने 1054 थकबाकीदारांना नोटीस बजावल्या त्यानंतर मालमत्ता जप्त करून त्याचे लिलाव देखील काढले परंतू यातील एकाही क्रियेला प्रतिसाद मिळतं नसल्याने अखेरीस आता पालिकेनेचं दोन पावले मागे येत अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोळा सप्टेंबरपासून या अभय योजना अमलात येणार आहे. सोळा ते तीस सप्टेंबर दरम्यान थकबाकी अदा केल्यास 75 टक्के दंड माफ केला जाणार आहे. एक ते 10 ऑक्‍टोंबर दरम्यान थकबाकी अदा केल्यास दंडात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे तर 11 ते 15 ऑक्‍टोंबर दरम्यान थकबाकी अदा केल्यास दंडाच्या रक्कमेत 25 टक्के सवलत दिली जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com