स्मार्ट सिटीचे सीईओ थविल यांची पाठराखण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नाशिक, ता. 14- निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा विरोध असतानाही त्याला न जुमानता महासभेत नगर परियोजनेला मंजुरी देण्यात आली व विशेष म्हणजे सार्वजनिक सुट्टी असतानाही त्याचं दिवशी महापौरांकडून प्रशासनाला ठराव सादर करताना दाखविलेली तत्परता स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या कारवाईबाबत न दाखविल्याने महापौर रंजना भानसी यांच्याकडून थविल यांना पाठीशी घातले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. 

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची कारकीर्द अनेक वर्षांपासून वादात आहे. गावठाण भागात चोविस तास पाणी पुरवठ्यासाठी स्काडा तंत्रज्ञानावर आधारीत मीटर बसविण्याच्या निविदा प्रक्रियेत नियम बाजूला सारणे, स्मार्ट रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला पाठीशी घालणे, नगरसेवकांना स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रकल्पांबद्दल पुरेशी माहिती न देणे आदी बाबी थविल यांच्या विरोधातील रोषाला कारणीभुत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत नगर परियोजनेवर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या सह जेष्ठ नेते चर्चा करतं असताना थविल यांनी कुत्सितपणे केलेल्या हास्यामुळे नगरसेवकांचा रोष वाढला होता. थविल यांची तातडीने बदली करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची जोरदार मागणी करण्यात आली. महापौर रंजना भानसी यांनी देखील नगरपरियोजनेवर निर्णय देताना थविल यांच्या कार्यपध्दतीवर टिका केली व त्यांच्या बदलीचा प्रशासनाने प्रस्ताव देण्याच्या सुचना दिल्या. परंतू प्रशासनाला नगरपरियोजनेचा ठराव तर मिळाला परंतू थविल यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील ठराव न मिळाल्याने महापौरांचीचं भुमिका वादात सापडली आहे. 
स्मार्ट सिटी सभेला बगल 
स्मार्ट सिटी कंपनी मार्फत सुरु असलेल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाला असून स्मार्ट सिटी मार्फत नेमके कुठली कामे चालु आहेत. याची माहिती घेण्यासाठी विशेष महासभा घेण्याचे महापौर भानसी यांनी यापुर्वी जाहीर केले होते परंतू अद्यापपर्यंत विशेष महासभा झाली नाही. सभा झाली असती तर थविल यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार झाला असता त्यात त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी होण्याच्या शक्‍यतेने महापौरांनी अद्यापपर्यंत सभा टाळल्याचे बोलले जात आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnews smartcity CEO