कॉर्पोरेशन बॅंकेला 70 लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नाशिक : मिळकतीचे बनावट सातबारा उतारे व दस्तऐवज बनवून कॉर्पोरेशन बॅंकेस 69 लाख 42 लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंकेच्या सल्लागार विधीअधिकाऱ्यानेही खोटा सर्चरिपोर्ट बॅंकेला सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

उत्तम बाजीराव जाधव, मनोहर दौलत गायकवाड, सविता उत्तम जाधव (सर्व रा. पिंप्री अंचला, ता. दिंडोरी) असे संशयितांची नावे आहेत. बॅंकेचे व्यवस्थापक जितेशकुमार जिवनलाल परमार यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी संगनमत करून 25 नोव्हेंबर 2013 ते 14 ऑगस्ट 2014 या दरम्यान, कॉर्पोरेशन बॅंकेकडे कर्जप्रकरणासाठी एका मालमत्तेचा 7/12 उतारा सादर केला. तसेच बॅंकेच्या पॅनलवरील वकीलांनी संशयितांनी सादर केलेले उतारे निर्वेध आणि कोणताही बोजा नसल्याचे खोटे टायटल सर्च रिपोर्ट दिले. त्याआधारे बॅंकेने कर्जदारास शेडनेट, पिककर्ज व लिफ्ट इरिगेशनसाठी 48 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर संशयितांनी कर्जाचे हप्ते व व्याजाची 21 लाख 42 हजार 998 रुपये अदा केले नाही. त्यामुळे संशयितांनी कर्जाचे 48 लाख व त्यावरील व्याज असे 69 लाख 42 हजार 998 रुपयांची बॅंकेची फसवणूक केली. याप्रकरणी बॅंकेने न्यायालयात धाव घेत तक्रार केली. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnewspolicefroud

टॅग्स