..तर पोलीसरुपी विघ्न मानगुटीवर बसेल 

live photo
live photo

नाशिक : गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचा उत्सव असून गणपती बाप्पा हे बुद्धीचा देवता आणि विघ्नहर्ता आहे. परंतु काही अनिष्ठ प्रथा रुढ झाल्याने गणेशोत्सवात विकृती शिरल्या आहेत. अशा विकृतींना घालविण्यासाठी आता पोलीसरुपी विघ्न संबंधितांच्या मानगुटीवर बसेल आणि पुढे काय होते ते वेगळे सांगणे नको, असा सूचक इशारा पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला. 

गंगापूर रोड परिसरातील प्रसाद मंगल कार्यालयामध्ये गंगापूर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील बोलत होते. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, शहर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्य आयुक्त प्रदीप जाधव, मंगलसिंह सूर्यवंशी, गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल उपस्थित होते. श्री. नांगरे-पाटील म्हणाले, आगामी सण÷उत्सवाच्या काळात शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे. महिलांची सुरक्षिततेला प्राधान्यक्रम आहे. गणेशोत्सवा मद्यपान करून नाचणे, अश्‍लिल गाणे वाजविणे, डीजे-डॉल्बीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे अशांना गणपती पोलीसांच्या रुपाने विघ्नकारक असेल असा इशाराही दिला. तर, आमदार सीमा हिरे यांनीही, पश्‍चिम महाराष्ट्रावर ओढावलेले पुराच्या संकटामुळे शहरातील बहुतांश मंडळांनी त्यांची वर्गणी पुरग्रस्तांना दिला आहे. उत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचे पालन केले जाईल अशी हमी दिली. 
यावेळी नगरसेवक विलास शिंदे, संतोष गायकवाड, वैशाली भामरे, फ्रावशी ऍकॉडमीचे रतन लथ, करण गायकर, सत्यम खडांगळे, निलेश सौदागर, स्वप्निल पाटील, स्मिता जोशी, देवेंद्र जोशी, देवदत्त जोशी, माजी पोलीस अधिकारी मंडालेश्‍वर काळे आदींसह गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com