उपनिरीक्षक भरसट, सहाय्यक उपनिरीक्षक उगलमुगले यांना विशेष पोलीस पदक

Residential photo
Residential photo

नाशिक : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहविभागामार्फत पोलीस दलातील उत्कृष्ठ कामगिरीसाठीचे पदक जाहीर करण्यात आले. पोलीस दलातील ÷उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भरसट व सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रय उगलमुगले यांना विशेष पोलीस पदक जाहीर झाले आहेत. पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी विशेष कौतूक केले आहे. राज्यातील 41 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून त्यात नाशिक ग्रामीणच्या दोघांचा समावेश आहे.
...
नाशिक ग्रामीण पोलीस दलात दहशतवाद विरोधी कक्षामध्ये कार्यरत असलेले रघुनाथ मंगळू भरसट यांना विशेष पोलीस पदक जाहीर झाले आहे. मूळचे हरणटेकडी, हरसुल येथील रहिवाशी असलेले श्री. भरसट हे 22 ऑगस्ट 1989 रोजी नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर ते कळवण, हरसुल, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, अभोणा आणि पेठ याठिकाणी सेवा केली. तर सध्या मुख्यालयातील दहशतवाद विरोधी कक्षात ते उपनिरीक्षक म्हणून रूजू आहेत. 2013 मध्ये झालेल्या पोलीस खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले होते. त्यानुसार त्यांना 1 मे 2016 मध्ये उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. त्यांना सेवाकाळात 150 रिवॉर्डस्‌ मिळाले आहेत. मात्र त्यांनी केलेल्या आदिवासी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना विशेष पोलीस पदक जाहीर करण्यात आले.
नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले दत्तात्रय तुकाराम उगलमुगले यांना ÷उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पोलीस पदक जाहीर झाला आहे. तळेगाव, दिंडोरी येथील मूळ रहिवाशी असलेले श्री. उगलमुगले हे 1 मार्च 1989 रोजी नाशिक ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते. 1989 ते 2004 पर्यंत ते विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयामध्ये कर्तव्यावर होते. तर 2004 पासून ते आत्तापर्यंत ते नाशिक ग्रामीण पोलीस दलात रुजू झाले. या दरम्यान, त्यांनी नाशिक तालुका पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हेशाखा आणि सध्या वाचक शाखेमध्ये कार्यरत आहेत. आपल्या सेवेकाळात त्यांनी आत्तापर्यंत 480 रिवॉर्डस्‌ प्राप्त केले आहेत. त्याच उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सदरचे पदक जाहीर झाले आहे.

विशेष आनंद झाला आहे. पोलीस सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणे सेवा केल्याचा आनंद होतो आहे.
- रघुनाथ भरसट, पोलीस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण.

विशेष पोलीस पदक प्राप्त झाल्याचा आनंद आहेच. त्यामुळे आणखी कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळाली आहे.
- दत्तात्रय उगलमुगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com