साक्री शहर होणार हागणदारीमुक्त

धनंजय सोनवणे
सोमवार, 5 डिसेंबर 2016

२०१७ पर्यंत १५०० शौचालयांचे उद्दिष्ट; पहिल्या टप्प्यात एक कोटी १८ लाखांचा निधी
साक्री - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत शहरी अभियानांतर्गत साक्री शहरात २०१७ अखेर १५०० शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात ९८५ शौचालयांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून एक कोटी १८ लाख रुपये अनुदान नगरपंचायतीस मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांना तीन टप्प्यांत शासनाकडून प्रत्येकी १२ हजार रुपये, तर नगरपंचायतीकडून तीन हजार असे एकूण १५ हजार रुपये शौचालयाच्या बांधकामासाठी मिळणार आहेत. यासाठी नगरपंचायतीकडे अर्ज करावयाचा आहे.

या योजनेसाठी काही अटी घालण्यात आल्या असून, यात लाभार्थी हा शहरातील रहिवासी असावा, घरकुल योजनेचा लाभार्थी नसावा, घरात आधीपासून शौचालय नसावे, याआधी शौचालयाच्या कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा, एका कुटुंबासाठी एकच शौचालयाचा लाभ घेता येईल, नगरपंचायतीचा थकबाकीदार नसावा, लाभार्थीकडे शौचालय बांधण्यास पुरेशी जागा उपलब्ध असावी, यांचा त्यात समावेश आहे. तसेच या योजनेचा अतिक्रमणधारकांनाही लाभ घेता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अर्ज नगरपंचायतीकडे सादर करावा लागणार असून, यासाठी विहित नमुना अर्जासोबत स्वतःचे बॅंक खाते क्रमांक, पासबुक झेरॉक्‍स, आधार कार्ड झेरॉक्‍स, रेशन कार्ड झेरॉक्‍स, पॅनकार्ड झेरॉक्‍स, दोन पासपोर्ट फोटो, तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नगरपंचायत कर भरल्याची पावती जोडावयाची आहे. अर्ज करणाऱ्यांची वरील अटी-शर्तींनुसार चौकशी करून लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यात पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

तीन टप्प्यांत धनादेश
शहर स्वच्छतेसाठी ही एक महत्त्वाची योजना असून, यात एकूण एक हजार पाचशे शौचालये २०१७ अखेर बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. याच अनुषंगाने लाभार्थ्यांना शासनस्तरावरून द्यावयाचे प्रत्येकी बारा हजार अनुदानाचे एकूण एक कोटी १८ लाख रुपये नगरपंचायतीस मिळणार असून, यात नगरपंचायतीचे तीन हजार मिळून एकूण पंधरा हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे. हे तीन टप्पे शौचालयाच्या बांधकामाचे असून, याची संबंधित अधिकारी पाहणी करून पुढील टप्प्याचे धनादेश मंजूर होणार आहेत.

Web Title: Sakari city will haganadari free