भिडे यांना न्यायालयात हजर होण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नाशिक - जूनमध्ये येथे झालेल्या सभेत वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना येत्या 31 ऑगस्टला जिल्हा न्यायालयामार्फत हजर होण्याचा आदेश बजावला जाणार आहे. नाशिक महापालिकेने याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात भिडे गुरुजी यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. त्यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना हजर राहण्याची नोटीस बजावली.

जिल्हा न्यायालयात गेल्या मंगळवारी (ता.7) सुनावणीवेळी महापालिकेतर्फे युक्तिवाद करण्यात आला. त्यावर आज पुन्हा सुनावणी झाली. या वेळी सुवर्णा शेफाल यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. जयदीप पांडे यांनी संभाजी भिडे यांना 31 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. महापालिकेच्या चौकशी समितीसमोर उपस्थित न राहणारे भिडे न्यायालयात उपस्थित राहणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Web Title: Sambhaji Bhide court crime