संभाजी भिडेंना दुसऱ्यांदा समन्स 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

नाशिक - सभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना येत्या 12 ऑक्‍टोबर रोजी हजर राहण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयाने दुसऱ्यांदा समन्स जारी केले. भिडे यांना आज (ता.28) न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले असतानाही ते अनुपस्थित राहिले. नाशिकमध्ये आयोजित सभेदरम्यान भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी करून त्यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. न्यायालयात हजर राहण्याबाबतचे समन्स त्यांच्यापर्यंत पोचले नसल्याचे न्यायालयास स्पष्ट झाले. त्यामुळे न्या.

नाशिक - सभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना येत्या 12 ऑक्‍टोबर रोजी हजर राहण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयाने दुसऱ्यांदा समन्स जारी केले. भिडे यांना आज (ता.28) न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले असतानाही ते अनुपस्थित राहिले. नाशिकमध्ये आयोजित सभेदरम्यान भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी करून त्यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. न्यायालयात हजर राहण्याबाबतचे समन्स त्यांच्यापर्यंत पोचले नसल्याचे न्यायालयास स्पष्ट झाले. त्यामुळे न्या. जयदीप पांडे यांनी आज पुन्हा दुसऱ्यांदा त्यांना समन्स बजावले. 

Web Title: Sambhaji Bhide second summons