Rahul Narwekar : ॲसिड हल्ला प्रकरणी राज्य सरकारने निवेदन करावे; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश

Acid Attack on Minor Girl Raises Concern in Assembly : संगमनेर येथील ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे.
Rahul Narwekar

Rahul Narwekar

sakal

Updated on

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सहावीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेचा मुद्दा बुधवारी विधानसभेत उपस्थित झाला. याप्रकरणी आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात न आल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार, नाना पटोले आणि अस्लम शेख यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला लक्ष केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com