संगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

संगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. एका किशोरवयीन मुलासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. अकोले बाह्यवळण रस्त्यावर आज सकाळी पावणे आठच्या सुमारास ही घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथील जयंत सांत्रस त्यांच्या भाचीच्या  विवाहासाठी पत्नी, मुलगा, सासु, यांच्यासह पिंपळगाव बसवंत येथील विवाहीत मुलगी व जावयाच्या स्विफ्ट कार ( एमएच. 15 डीएस. 7655 ) मधून पुण्याकडे निघाले होते. जावई भुषण दिलीप वाळेकर (वय 34) कार चालवित होते. संगमनेर तालुका हद्दीतील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर, अकोले बाह्यवळण रस्त्याजवळील पुलाच्या उतारावर डावीकडे असलेल्या मालपाणी यांच्या तंबाखू गोदामाकडे वळणारा गुजरात येथून तंबाखूची पोती घेवून येणारा मालट्रक (जीजे. 6 वाय 8386) च्या डावीकडील बाजूने भरधाव वेगातील कार थेट मागील चाकापर्यंत आत घुसल्याने, चालक, तसेच आर्यन जयंत सांत्रस ( वय 14 ) यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटने बाबत समजताच संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंह राजपूत तात्काळ घटनास्थळी गेले. अपघातग्रस्त कारचे पत्रे व दरवाजे तोडून आतील मृतांना बाहेर काढण्यात आले. तर गंभीर जखमी झालेले जयंत शामसुंदर सांत्रस (वय 45), मोहिनी जयंत सांत्रस (वय 42), उषा शरद लोहारकर (वय 60) व देवयानी भुषण वाळेकर (वय 23) यांना उपचारार्थ संगमनेरच्या डॉ. तांबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

पोलिसांनी दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती समजताच, मृतांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी संगमनेरला धाव घेतली व सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे रवाना केले आहे.

Web Title: Sangamner - Two people were killed and four seriously injured in a car on the car