नाशिक - सटाण्याच्या उपनगराध्यक्षपदी संगीता देवरे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या संगीता संदीप देवरे यांची काल शुक्रवारी (ता.२७) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुवर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी काम पहिले.

सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या संगीता संदीप देवरे यांची काल शुक्रवारी (ता.२७) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुवर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी काम पहिले.

पालिकेच्या मावळत्या उपनगराध्यक्षा सुवर्णा नंदाळे यांनी आवर्तनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी पालिका सभागृहात आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी संगीता देवरे यांच्या नावाची सूचना नगरसेवक महेश देवरे यांनी आणली. त्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे यांनी अनुमोदन दिले. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सौ. देवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कुवर यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. निवडीचे वृत्त सभागृहाबाहेर येताच देवरे यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नंदाळे यांनी नूतन उपनगराध्यक्षा सौ. देवरे यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला. तर नगराध्यक्ष सुनील मोरे व मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन देवरे यांचा सत्कार करण्यात आला. शहर विकासाकरिता शासनाच्या विविध योजना राबविणार असून शहरवासियांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देवरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

देवरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. यानंतर देवरे यांची ढोल ताशांच्या गजरात चार फाटा ते मल्हार रोडपर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश खैरनार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे, कॉंग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, दीपक पाकळे, महेश देवरे, आरिफ शेख, बाळासाहेब बागुल, नगरसेविका सुलोचना चव्हाण, डॉ. विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव, संगीता मोरकर, पुष्पा सूर्यवंशी, आशा भामरे, भारती सूर्यवंशी आदींसह संदीप देवरे, राजेंद्र देवरे, मुन्ना सोनवणे, बॉबी देवरे, निलेश पाटील, धीरज विश्वंभर, राजकुमार सोनी, शुभम बोरसे, कोमल सोनवणे, मंगेश भावसार, चेतन मोरे, अक्षय सोनवणे, सागर पवार, हर्षवर्धन सोनवणे, देवेंद्र येवला, अक्षय खरे, पार्थ सोनवणे, मयूर निकुंभ आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा संगीता देवरे यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे सासरे (कै.) कृष्णा नानाजी देवरे यांनी सन १९७१ व सन १९७४ मध्ये सटाण्याचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. तर जेठ (कै.) नितीन देवरे हे माजी नगरसेवक, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष (कै.) अर्जुनराव अहिरे यांचे निकटवर्तीय होते. सासरे (कै.) कृष्णा देवरे यांच्या कारकिर्दीतच पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, व्यापारी संकुल तसेच पहिल्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाकडून संधी न मिळाल्याने सौ. देवरे यांनी अपक्ष उमेदवारी करीत भरघोस मतांनी विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांनी शहर विकास आघाडीत प्रवेश केला.

Web Title: sangita devare elected as deputy chief of satan nagar parishad