संजय वाघ यांना छत्रपती शिवाजी महाराज लोकनायक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

सटाणा - येथील प्रगतीशील शेतकरी संजय वाघ (शिरसमणीकर) यांना भारतीय निसर्ग साधनेच्या प्राचीन कला, संस्कृती व सभ्यतेचे संवर्धन करणाऱ्या विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकादमी व समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग व आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'छत्रपती शिवाजी महाराज लोकनायक राष्ट्रीय पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. 

मुंबई येथील म्हैसूर असोशिएन ऑडिटेरीयममध्ये आयोजित राष्ट्रीय निसर्गसाधना कला, संस्कृती, महासंमेलनात या पुरस्कारांचे वितरण झाले. संजय वाघ शिरसमणीकर यांनी प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने शेती केली असून पाणी आडवा पाणी जिरवा व वृक्षारोपण माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन यंदा या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची नाशिक विभागातून निवड करण्यात आली होती. आई फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, उद्योगपती डॉ.विनोदराव मोरे व विद्यार्थी विकास अकादमी व समृद्धी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ.बी.एन.खरात यांच्या हस्ते त्यांना शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र, सुवर्णपदक व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी दिल्ली येथील सामाजीक न्याय विभागाचे अध्यक्ष भावीणभाई हरीयाणी, अभिनेते शशिकांत शिंदे, अभिनेत्री नीतू सरदाना आदी उपस्थित होते. श्री. वाघ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Web Title: sanjay wagh got chatrapati shivaji maharaj loknayak rashtriya puraskar