जिंगल बेल्स, जिंगल बेल्स जिंगल ऑल द वे...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

नाशिक - अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या नाताळ सणाच्या पार्श्‍वभूमीवर ख्रिसमस ट्री, शोभेच्या वस्तू यांनी बाजारपेठ सजली आहे. सांताक्‍लॉजची विविध रूपे हे यंदाचे विशेष आकर्षण आहे.

नाताळ हा सण ख्रिश्‍चन बांधवांपुरताच सीमित न राहिल्याने तरुणांना आकर्षित करतील अशा विविध वस्तू सणानिमित्त बाजारात दाखल झाल्या आहेत. या सणांतील मुख्य भाग असलेल्या ख्रिसमस ट्रीच्या सजावटीचे साहित्य दीडशे रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहे, तर सजावटीसाठी गिफ्ट मोजे, जिंगल बेल, रंगीबेरंगी झिरमिळ्या, बर्फाचे डेकोरेशन हे ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 
 
सांताक्‍लॉजची लोभस रूपे
तरुणांना विशेष भावणाऱ्या टेडीबेअर किंवा फर स्वरूपातील गिफ्टला असलेली मागणी लक्षात घेता फर किंवा वेलवेटच्या स्वरूपात झोक्‍यावरचा सांताक्‍लॉज, गिटार वाजविणाऱ्या सांता, झाडाखाली बसलेला अशा विविध सांताक्‍लॉजची निरनिराळी रूपे हे यंदाचे विशेष आकर्षण आहे. सर्वसाधारणपणे पाठीवर गिफ्टची पोतडी घेतलेला सांता असतो मात्र या निराळ्या रूपांतील सांताक्‍लॉज हा तरुणींना विशेष भावतो आहे.   

नाताळ सणाच्या पार्श्‍वभूमीवर विविध वस्तू बाजारांत दाखल झाल्या असल्या, तरी नेहमीच्या वस्तूंत काही इलेक्‍ट्रॉनिक्‍स किंवा सेल यांचा वापर करून आधुनिक करण्यावर भर देण्यात आला आहे.
- हृषीकेश कोरडे (विक्रेता)

Web Title: santa clause for christmas