बछडा मोरसह राजलक्ष्मी प्रथम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

सारंगखेडा - देखण्या व रुबाबदार मारवाड जातीच्या घोड्यांच्या प्रदर्शन स्पर्धेत "राजलक्ष्मी' (अदंत) या अश्‍वाला, तर बछडा (दोन दात) या अश्‍वात "मोर'ला पहिल्या पुरस्काराचा मान मिळाला. येथे एकमुखी दत्ताची यात्रा सुरू आहे. या निमित्त चेतक फेस्टिव्हलअंतर्गत विविध स्पर्धा सुरू आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून अश्‍व प्रदर्शनात स्पर्धा घेतल्या जात आहेत. त्यासाठी देशभरातून घोडे व्यापारी येथे येत आहेत. त्या अंतर्गत देखण्या व रुबाबदार अश्‍वांची स्पर्धा झाली. त्यात मारवाड जातीच्या बछडी (अदंत) व बछडा (दो दात) अश्‍व वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात नगर येथील राज सातपुते यांची मारवाड (बछडी) अदंत राजलक्ष्मी ही प्रथम, अहमदाबाद येथील सुरेश देसाई यांची रुडी द्वितीय, तर गांधीनगर येथील अविनाश पटेल यांची तक्षशिला हिने तृतीय क्रमांक पटकावला. यात स्पर्धेत 19 अश्‍वांचा सहभाग होता.

Web Title: sarangkheda news horse exhibition competition