Sarv Shiksha Abhiyan : 1 कोटी 97 लाखांचा निधी पडून; खर्च न झाल्यास शासनाकडे परतण्याची भीती

sarv shiksha abhiyan
sarv shiksha abhiyan
Updated on

Sarv Shiksha Abhiyan : सर्व शिक्षण अभियानांतर्गत २०२३-२०२४ या वर्षासाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश, बूट आणि पायमोजे आदींसाठी जिल्ह्यातील ८९ हजार २६४ विद्यार्थ्यांकरिता पाच कोटी ३५ लाख ५८ हजार ४०० निधी अपेक्षित होता. जिल्हा परिषदेतर्फे पहिल्या टप्प्यात दोन कोटी ६७ लाखांच्या निधीची तरतूद झाली.

हा निधी समग्र शिक्षांतर्गत खात्यावर अर्थ विभागाने जमा केला. मात्र, यामधील सार्वजनिक लेखा व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) स्वतंत्र हेड नसल्याने निधी तालुकास्तरावर खर्च करणे अडचणीचे झाले. त्यामुळे एक कोटी ९७ लाखांचा निधी पडून आहे. तो खर्च न झाल्यास शासनाकडे परतण्याची भीती आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

समग्र शिक्षांतर्गत जिल्हा परिषद, अनुदानित, नगर परिषद शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या‍ सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी विद्यार्थ्यांना शासनाकडून वर्षाला दोन गणवेश मोफत पुरविले जातात. जिल्ह्यातील ४७ हजार ६७४ विद्यार्थिनी तसेच ४१ हजार ५९० विद्यार्थी, त्यात अनुसूचित जाती संवर्गाचे दोन हजार २२५, अनुसूचित जमाती संवर्गाचे ३१ हजार २०४ व आठ हजार १६१ दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

यंत्रणेचे असे नियोजन

सर्व विद्यार्थ्यांना नियमित एक गणवेश, एक पीटीचा गणवेश, बूट व पायमोज्यांसाठी पैसे देण्यात आले. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला नियमित दोन गणवेशांऐवजी बहुतेक विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्यात आला.

शासनाने एका गणवेशासाठी तीनशे रुपये दिले. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला सहाशे रुपयांत एक गणवेश व एक पीटी गणवेश देण्यात आला. शाळेचा नियमित गणवेश आणि पीटी गणवेशासह बूट, मोजे वितरित झाले. त्यामुळे विद्यार्थ्याला शाळेचे सहा दिवस व एक दिवस पीटी गणवेश वापरावा लागतो.

sarv shiksha abhiyan
Dhule Leopard News : कोरड्याठाक पाणवठ्यांमुळे वन्यपशू सैरभैर; मनकराई, देऊरचा माथा शिवारात बिबट्याचे दर्शन

निधीबाबत सबब

शासनाकडून दोन टप्प्यांत अनुदान दिलेले असताना आता ते परत जाण्याची भीती आहे. जिल्ह्यात यासाठीचा सुमारे एक कोटी ९७ लाखांचा निधी पडून आहे. शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी निधी कमी पडत असल्याच्या सबबीखाली शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशासाठी दिलेला निधी परत मागविण्याचा प्रसंग राज्य सरकारवर आला आहे.

एकट्या शिरपूर तालुक्यात शासनाकडून दोन टप्प्यांत एक कोटी ५६ लाख ४६ हजार ४०० रुपयांचे अनुदान २४ हजार २०३ विद्यार्थ्यांसाठी प्राप्त झाले. त्यात सर्व मुली १२ हजार ५९८, अनुसूचित जमाती संवर्गाचे नऊ हजार ६२०, अनुसूचित जाती संवर्गाचे ५७९, तर दारिद्र्यरेषेखालील एक हजार ४०६ विद्यार्थ्यांना गणवेश वितरित झाले. त्यातच ११ लाख ७० हजार ४०० रुपये अनुदान परत करण्याची सूचना आहे.

तालुकानिहाय लाभार्थी विद्यार्थी

* साक्री .............. २७ हजार ४०८

* शिरपूर ..............२४ हजार ५१०

* धुळे ................ २१ हजार ५८७

* शिंदखेडा ............१३ हजार ०५८

* धुळे मनपा ...........०१ हजार ९७०

sarv shiksha abhiyan
Dhule News : नंदाभवानी मंदिर कामाची स्थगिती उठली ः पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com