विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

सटाणा - गर्भपातास नकार दिल्याने रूपाली विलास कुमावत (वय 24) या विवाहितेचा छळ करत पतीने दीर व सासऱ्याच्या मदतीने अंगावर पेट्रोल टाकत तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना येथे शुक्रवारी (ता. 23) मध्यरात्री घडली. यात ती 55 टक्के भाजली आहे. घघटनेनंतर पती, सासरा व दीर फरारी आहेत.

कुमावत कुटुंबीय तालुक्‍यातील नामवंत बांधकाम व्यावसायिक आहेत. दशरथ कुमावत यांचा मोठा मुलगा विलास कुमावत याची पत्नी पाच महिन्यांची गर्भवती होती. मात्र कुमावत कुटुंबीयांना हे मूल नको होते. त्यामुळे विलास सातत्याने पत्नी रूपालीला मारहाण करून गर्भपात करण्याचा दबाव टाकत असे; परंतु तिने विरोध केला होता. शुक्रवारी मध्यरात्री विलासने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. याचवेळी दीर योगेश कुमावतने रूपालीच्या अंगावर पेट्रोल टाकले, तर विलासने तिला पेटवून दिले.

Web Title: satana nashik news crime