दोन शेतकऱ्यांची बागलाणमध्ये आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

सटाणा (जि. नाशिक) - शासनाने कर्जमाफी जाहीर करूनही बागलाण व देवळा तालुक्‍यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सततची नापिकी व कर्जाला कंटाळून बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यातील निकवेल व कंधाणे येथील दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कृष्णा वाघ (वय 48) आणि अशोक काकुळते (वय 53) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. वाघ यांच्यावर पाच लाख रुपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे. घरात कुणीही नसताना त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. तर काकुळते यांना शेतीत मोठे नुकसान होऊन कर्जाच्या विंवचनेतून त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Web Title: satana nashik news two farmer suicide