सटाणा - सात विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धेत यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

सटाणा - येथील मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मिडिअम स्कूलमधील सात विद्यार्थ्यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धा परीक्षेत सुवर्णपदक मिळवत उज्वल यश मिळविले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा काल मंगळवार (ता.१७) रोजी शाळेतर्फे विशेष गौरव करण्यात आला.

सटाणा - येथील मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मिडिअम स्कूलमधील सात विद्यार्थ्यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धा परीक्षेत सुवर्णपदक मिळवत उज्वल यश मिळविले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा काल मंगळवार (ता.१७) रोजी शाळेतर्फे विशेष गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयासोबतच इंग्रजी व्याकरणाचे सखोल ज्ञान मिळावे यासाठी डोंबिवली येथील इंग्लिश मॅरेथॉन एज्यूकेशन थ्रू कॉम्पीटीशन या संस्थेतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या पहिल्या परीक्षेत येथील मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मिडियअम स्कूलमधील ३५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यातील १९ विद्यार्थ्यांची दुसऱ्या स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली होती. त्यापैकी यशवर्धन शेवाळे, वेदिका अहिरे, भूमिका शेवाळे, ओम पाटील, सुयोग अहिरे, प्रगती बोरसे, अनुष्का बच्छाव या सात विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. 

शाळेत आज आयोजित विशेष समारंभात माजी संचालिका शकुंतला भामरे, केंद्रप्रमुख हेमलता धोंडगे, लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक ए. डी. सोनवणे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील शाळेच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुख्याध्यापिका श्रीमती एस. आर. चंद्रात्रे व परीक्षा विभागप्रमुख विनय सोनवणे यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास वैशाली पवार, अश्विनी निकम, अनुराधा अहिरे, सारिका कदम, वैशाली निकम, वैशाली सावंत, मोहिनी सोनवणे, जयश्री भामरे, अतुल कापडणीस, हर्षल कापडणीस, दीपक जाधव, अविनाश वाघ, मोहसीन शाह, एजाज शाह, खुशाल कोर, दिपाली सोनवणे, हर्षला अहिरे, श्रद्धा निकम, अमृता सोनवणे, स्वाती चव्हाण, हर्षिता ह्याळीज आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Satana - The success in state-level English marathon tournament