व्हीआरएस फूडवर 'एमपीसीबी'ची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

सातपूर - प्रदूषणाच्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल नगर जिल्ह्यातील व्हीआरएस फूड यांच्या पारस दूध प्रकल्पातील उत्पादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) थांबविले आहे. व्हीआरएसविरुद्ध मंडळाला प्रदूषणाबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत व्यवस्थापनाला अनेकदा नोटिसा देऊन सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या; परंतु व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे अखेर "एमपीसीबी'ने या प्रकल्पातील उत्पादन थांबविण्याची कारवाई केली. कंपनीतर्फे प्रदूषण रोखण्यासाठी; तसेच उत्पादन केल्यानंतर प्रदूषित झालेले पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून दिले जात असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिलेल्या भेटीत आढळले होते.

या प्रकाराबाबत व्यवस्थापन सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. "एमपीसीबी'ने अचानक केलेल्या कारवाईमुळे कंपनीचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झाले आहे, असे कंपनीचे व्यवस्थापक राजेश शर्मा यांनी सांगितले.

Web Title: satpur news mpcb crime on vrs food