'सिटू'च्या राज्य कार्यकारिणीची उद्या नाशिकमध्ये बैठक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

सातपूर - 'सिटू'च्या राज्य कार्यकारिणीची बैठक सिटूचे राष्ट्रीय अध्यक्ष के. हेमलता यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. 23) नाशिकमध्ये होणार असल्याची माहिती सिटूचे सीताराम ठोंबरे यांनी दिली. या बैठकीत, कामगार कायद्याची अंमलबजावणी, 18 हजार रुपये किमान वेतन, कंत्राटी पद्धत रद्द करणे, समान काम- समान वेतन, असंघटित कामगारांसाठी कायद्याची अंमलबजावणी, आउटसोर्सिंगला विरोध, सर्वांना पेन्शन आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. कामगारांच्या हितासाठी कामगार कायद्यात बदल करण्यासाठी सह्यांची मोहीम, तसेच एप्रिल महिन्यात मुंबईत एक लाख कामगारांचा मोर्चा काढण्याबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Web Title: satpur news situ state working committee meeting in nashik

टॅग्स