Dhule News : कागदपत्रांची डिजिटल कॉपी लॉकरला जतन करा | Save digital copy of document in locker dhule news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digi-Locker

Dhule News : कागदपत्रांची डिजिटल कॉपी लॉकरला जतन करा

Dhule News : केंद्र शासनातर्फे डिजिलॉकर (DigiLocker) प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये केंद्र/राज्य शासनातर्फे नागरिकांना जारी करण्यात येणाऱ्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी डिजिलॉकरमध्ये उपलब्ध आहे.

अर्जदाराने त्यांचा आधार क्रमांक डिजिलॉकरबरोबर संलग्न (Link) करून डिजिलॉकरमध्ये आपले कुठलेही कागदपत्र जतन करू शकणार आहेत. (Save digital copy of document in locker dhule news)

केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MORTH) यांनी वाहनचालक अनुज्ञप्ती आणि नोंदणी प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी डिजिलॉकर मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली आहे.

या संदर्भात ७ सप्टेंबर २०१६ ला पत्रक जारी केले आहे. तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या ८ ऑगस्ट २०१८ च्या पत्राद्वारे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कागदपत्र उपलब्ध असल्यास त्याचे पुस्तकी स्वरूपात पुन्हा मागणी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एखाद्या प्रकरणात अनुज्ञप्ती नोंदणी प्रमाणपत्र जप्त करावयाचे असल्यास अंमलबजावणी पथकाने त्याची ई-चलन माध्यमातून वाहन/सारथी प्रणालीमध्ये घ्यावी व अशा प्रकरणात फिजिकल स्वरूपातील कागदपत्रे जप्त करण्याची आवश्यकता नाही, अशी सूचना दिली आहे.

ज्या अर्जदाराचे लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र परिवहन कार्यालयात प्रलंबित आहेत त्यांनी या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.