'ई-सकाळ'वर बातमी झळकताच मिळाला शाळेला शिक्षक

दीपक कच्छवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

कुलूप ठोकल्यानंतर मिळाला शिक्षक
दसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला आज सकाळी कुलुप ठोकले.चार वर्गांची जबाबदारी एका शिक्षकेवर होती.सकाळी  ग्रामस्थांनी कुलुप ठोकल्यानंतर ची बातमी 'इ'सकाळ ला झळकताच प्रशासन खडबडून जागे झाले.तात्काळ केद्रप्रमुख लखीचंद कुमावत यांनी  करगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक  सुनिल झोडगे यांची तात्पुरती नियुक्ती केली. गेल्या तेरा  महीन्या पासून शिक्षक मिळाला नाही.परंतु शाळेला कुलुप ठोकताच शिक्षक  मिळाला हे मात्र नक्की.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : दसेगाव (ता.चाळीसगाव)येथील जिल्हा परिषद शाळेला एका वर्षापासून चार वर्गाची जबाबदारी एकच शिक्षिका सांभाळत आहेत. त्यामुळे या  शाळेच्या विद्याथ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज सकाळी आठ वाजता शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व पालकांनी शाळेला कुलुप ठोकले.याचे वृत्त पहीले 'इ'सकाळ वर झळकताच तातडीने या शाळेवर शिक्षकाची व्यवस्था केली.त्यामुळे 'सकाळ' चे आभार मानले.  

दसेगाव (ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग असून, या शाळेत सुमारे 45 मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन वर्ग खोल्या असल्या तरी एक वर्षापासून योगिता राणे या प्रभारी मुख्याध्यापिकेलाच शिक्षक म्हणून कामकाज सांभाळावे लागत आहे. शिक्षण विभागाकडे वेळोवेळी या शाळेवर शिक्षक नियुक्ती करण्याची मागणी करूनही मात्र, कोणतीही दखल प्रशासनाकडून घेतली जात नव्हती.येथील शाळेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनिषा झोडगे, यांच्यासह सदस्य ग्रामस्थांनी शाळेला कुलुप ठोकले.त्यामुळे विद्याथ्यांना, शाळेच्या आवारातच बसावे लागले.

शिक्षण सभापती यांच्याशी चर्चा
दसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला कुलुप ठोकल्या नंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा मनिषा झोडगे यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती पोपट भोळे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.या चर्चेदरम्यान सभापती यांनी या शाळेवर तातडीने शिक्षक दिला जाईल.असे आश्वासन शिक्षण समितीचे सभापती पोपट भोळे यांनी दिले.मात्र जो पर्यंत शिक्षक मिळत नाही तो पर्यंत कुलुप उघडणार नाही असा पवित्रा अध्यक्षा मनिषा झोडगे यांनी घेतला होता.मात्र केद्रप्रमुख लखीचंद कुमावत यांच्याविषयी  शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह महिलांनी पोपट भोळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

'सकाळ' च्या वृत्ताची दखल
दसेगाव जिल्हा परिषद शाळेच्या चार वर्गांची जबाबदारी एका शिक्षेकेवर या मथळ्याखाली 'सकाळ' ने दि.24 फ्रेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते.त्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी या शाळेवरील शिक्षण सेवकच्या बदली प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. 

कुलूप ठोकल्यानंतर मिळाला शिक्षक
दसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला आज सकाळी कुलुप ठोकले.चार वर्गांची जबाबदारी एका शिक्षकेवर होती.सकाळी  ग्रामस्थांनी कुलुप ठोकल्यानंतर ची बातमी 'इ'सकाळ ला झळकताच प्रशासन खडबडून जागे झाले.तात्काळ केद्रप्रमुख लखीचंद कुमावत यांनी  करगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक  सुनिल झोडगे यांची तात्पुरती नियुक्ती केली. गेल्या तेरा  महीन्या पासून शिक्षक मिळाला नाही.परंतु शाळेला कुलुप ठोकताच शिक्षक  मिळाला हे मात्र नक्की.

येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक मिळावा म्हणून आम्ही वेळोवेळी शिक्षण विभागाकडे मागणी केली होती.परंतु आज देण्यात आलेला शिक्षक जर यापूर्वीच दिला असता तर मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले नसते.
- मनिषा झोडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा दसेगाव (ता.चाळीसगाव)
 

Web Title: school gets teacher in chalisgaon