पारा आणखी वाढल्यास शाळांच्या वेळा बदलणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नाशिक - उत्तर महाराष्ट्रात दोन दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी शक्‍यतो बाहेर पडणे टाळावे. अधिकाधिक पाणी प्यावे. उष्षतेची दाहकता अशीच राहिल्यास प्रसंगी शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, तूर्तास असा निर्णय अद्याप घेतलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. 

नाशिकमध्ये आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान वाढल्याने दाहकता वाढली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या आजारात वाढ झाली आहे. 42 अंशापर्यंत वाढलेल्या या तापमानात दोन दिवसांत आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागाने मध्य उत्तर महाराष्ट्रात पुढील 72 तास उष्णतेपासून काळजी घेण्याचे सुचविले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना उन्हापासून काळजी घ्यावी, असे आवाहन केले. पुढील दोन-तीन दिवस नागरिकांनी शक्‍यतो बाहेर पडणे टाळावे. गरज असेल अशा वेळी बाहेर पडावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. लहान मूल आणि ज्येष्ठ नागरिकांची पुढील दोन दिवसांच्या काळात प्रत्येकाने काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे. 

...तर वेळा बदलू 
पुढील दोन दिवस उन्हाच्या तीव्रतेचा अंदाज घेऊन गरज वाटल्यास, अंगणवाडीसह लहान मुलांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला जाईल. दहावी-बारावीसह माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन वर्गाच्या परीक्षा सुरू असल्याने त्याबाबत स्थानिक पातळीवर लागलीच निर्णय घेता येणार नाही. पण वातावरणात दाहकता अशीच वाढत राहिल्यास शाळांच्या वेळांच्या बदलांबाबत विचार केला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: school Times change