आता वन्यप्राण्यांची शिकार अन् वाहनचोरी 'अशी' थांबेल..कारण..

forest animals search with new invention.jpg
forest animals search with new invention.jpg

नाशिक : स्वस्त आणि सुलभ पद्धतीने देशातील अभयारण्यातील वन्यप्राण्यांवर निरीक्षण करणारे तंत्र येथील विद्यार्थ्याने विकसित केले आहे. पर्यावरण आणि भौतिक विषयाची सांगड घालणारा संशोधनाचा हा "तिसरा डोळा' जिल्हा विज्ञान प्रदर्शनात लक्षवेधी ठरला आहे. येथील के.जे.एन. विद्यालयाने इन्स्पायर ऍवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या बहुआयामी उपक्रमाची राज्यस्तरीय पातळीवर निवड झाली आहे. 

संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी 

संशोधन वृत्तीला चालना, मानवी गरजांच्या पूर्ततेला नवी दृष्टी मिळण्याच्या हेतूने शालेय पातळीवर विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना संधी देण्यात येते. या वर्षी संदीप फाउंडेशनमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत येथील विद्यालयाचे Radio frequency identification (RFId) हे नवे संशोधन निरीक्षकांचे लक्ष वेधून गेले आहे. अभयारण्यात हे नवे संशोधन दूरगामी परिणाम करणारे ठरणार असल्याचे मत निरीक्षकांनी नोंदविले आहे. वन्यप्राणी आणि विविध वाहने यांचे भौगोलिक अस्तित्व शोधणाऱ्या विद्यमान खर्चिक मोबाईल लहरींऐवजी रेडिओ लहरींच्याद्वारे कमी खर्चात लक्ष ठेवता येणार आहे. 

प्राणी आणि वाहन यांची सायरनद्वारे तत्काळ माहिती मिळणार 

वन्यप्राण्यांची होणारी शिकार आणि वाहनचोरीवर अंकुश ठेवणे या तंत्रामुळे सुलभ होणार आहे. एका साध्या चिपद्वारे वन्यप्राणी आणि वाहन यांचे वास्तव्य सहज शोधता येणार आहे. आखून दिलेल्या सीमा ओलांडून प्राणी आणि वाहन गेल्यास सायरनद्वारे त्याची तत्काळ माहिती मिळणार असल्याने शिकार आणि चोरी या प्रकारांना आळा घालता येईल, अशी माहिती नववीत शिकणाऱ्या भावेश जगताप याने दिली. 

प्रदर्शनात विद्यालयाच्या संघाला सन्मानचिन्ह देऊन गौरव

राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई व प्रादेशिक विद्या प्राधिकरण तसेच विज्ञान व गणित शिक्षण संस्था, नागपूर, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक व संदीप पॉलिटेक्‍निक कॉलेज यांच्यातर्फे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनात विद्यालयाच्या संघाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विज्ञान शिक्षिका ए. जे. शिंपी व एस. व्ही. पवार यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम बनविण्यात आला आहे. सादरीकरण आणि उपयोगिता मूल्य या वैशिष्ट्यामुळे हे उपक्रम राज्य पातळीवर निवडण्यात आले आहेत. संस्थेने संस्थापक ऍड. एल. के. निकम, अध्यक्ष शशिकांत निकम, के. जे. एन. मुख्याध्यापक टी. सी. अहिरे यांनी विजेत्या संघाचे कौतुक केले आहे.  
हेही वाचा>लग्न समारंभ आटोपून परतीच्या वाटेला निघाले... पण, रस्त्यात 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com