Self Employment Opportunity : पशुपालक, शेतकरी, बेरोजगारांनाही स्वयंरोजगाराची संधी; करा ऑनलाइन अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Employment News

Self Employment Opportunity : पशुपालक, शेतकरी, बेरोजगारांनाही स्वयंरोजगाराची संधी; करा ऑनलाइन अर्ज

धुळे : विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण पशुपालक, शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रा. शि. लंघे यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: Job Switch : या महिन्यांत चुकूनही घेऊ नका नोकरी बदलण्याचा निर्णय; योग्य वेळ कोणती ?

ग्रामीण सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणाचा पशुसंवर्धन विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणकप्रणाली लागू करण्यात येत आहे.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

यामध्ये शासनाने एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यास दर वर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये, तयार केलेली प्रतीक्षायादी पुढील पाच वर्षांपर्यंत म्हणजेच २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्जधारक पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांना प्रतीक्षायादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींसाठी नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

हेही वाचा: Amazon Job Scam: नोकरीचे आमीष देऊन घातला लाखोंचा गंडा! या चूका तुम्हीही करत असाल तर सावध व्हा

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https:ah.mahabms.com, मोबाईलवर AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध) ११ जानेवारीपर्यंत सुविधा उपलब्ध आहे. संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ आहे. त्यानुसार नावीन्यपूर्ण जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी-म्हशींचे गटवाटप करणे, शेळी-मेंढी गटवाटप करणे, हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिल्लांचे वाटप या योजनांसाठी ऑनलाइन लाभार्थी निवड राबविली जाणार आहे.

हेही वाचा: Job Resignation : नोकरीचा राजीनामा दिला की शेवटचा दिवस 'असाच' असतो

पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यांपैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा आहे. धुळे जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे पशुसंवर्धन विभागासह जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती हर्षवर्धन दहिते यांचे आवाहन आहे.