senior citizen diwali.jpg
senior citizen diwali.jpg

सुख वाटावे जनात दु:ख ठेवावे मनात!..ज्येष्ठ नागरिकांची 'यांच्या'सोबत दिवाळी

नाशिक : अमृतधाम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गोदानगर (सायखेडा) येथील विधवा माता- भगिनी, आर्थिकदृष्ट्या मागास १०० कुटुंबांना साडया, शर्ट पीस, पँट पीस, लहान मुलांचे कपडे, लहान मुलांची खेळणी, दिवाळीचे फराळ  व मिठाई वाटप करून संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली .  

आनंद वाटून घेऊन दिवाळी साजरी करण्यात खरी संस्कृती

दरवर्षीप्रमाणे यंदाही एक लाडू व करंजी दीन दुबळ्यांसाठी हा उद्देश ठेवून (ता.३०) गोदानगर गावातील सर्व गरजूंमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.  उपाध्यक्षा सुलभा लांडे यांनी यावेळी सांगितले  की, आनंद वाटून घेऊन दिवाळी साजरी करण्यात खरी संस्कृती आहे असे सांगितले. निर्मला गोसावी यांनी गोदानगर शाळेला नवनाथ सुडके व स्मिता लांडे यां शिक्षकांच्या तळमळीतून आम्हाला लोकांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळत आहे.असे सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा गोदानगरचे मुख्याध्यापक  नवनाथ सुडके, उपशिक्षक स्मिता लांडे- सुडके, रोहिणी लांडे- लिटे, यांनी केले. या कार्यक्रमास जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी निवृत्ती महाले, अण्णासाहेब संत, रमेश धोत्रे, शरद लासरकर, मधुकर लांडे, सुलभा लांडे, निर्मला गोसावी, मनीषा वायकोळे, इंदुमती भंगाळे, प्रकाश निकम, दीपक मदाने, सुभाष भावसार, बापूसाहेब बागुल, डॉ. धारस्कर, डॉ. जीराफे, नरेश कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी  गोदानगर ग्रामस्थ श्री मल्हारी गायकवाड, माणिक वाघ, भाऊलाल वाघ, विनोद चव्हाण, पांडुरंग वाघ, शंकर पीठे, शोभा डंबळे यांनी परिश्रम घेतलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृतधाम जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  शिवाजी वंजारी हे होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्ती महाले यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com