मोदींच्या धोरणाविरोधात दोन सप्टेंबरला संप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

नाशिक - एकीकडे जागतिक मंदीचा सामना विकसित देशांना करावा लागत असताना त्याचा फटका भारतालाही बसतो आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय अर्थव्यवस्था प्रगतिपथावर असल्याच्या बाता करीत आहेत. मंदीमुळे बेरोजगारांची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना, लोकसभा निवडणुकीवेळी मोदी यांनी दिलेले वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्‍वासन अखेर फसवे ठरल्याची टीका करीत, केंद्राच्या या चुकीच्या धोरणाविरोधात येत्या 2 सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारण्यात आल्याची माहिती खासदार व सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे (सीटू) राष्ट्रीय सरचिटणीस तपन सेन यांनी दिली.

आजपासून सुरू झालेल्या "सीटू‘च्या ऑल इंडिया वर्किंग कमिटीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार तपन सेन बोलत होते. खासदार सेन यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना सांगितले, की दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी बेरोजगारांना वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले होते.

Web Title: September strike two against Modi policy