द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची केली सात लाखांची फसवणूक

Seven lakh fraud with grape producer farmer at vani nasik
Seven lakh fraud with grape producer farmer at vani nasik

वणी (नाशिक) : येथील द्राक्षउत्पादक आदिवाशी शेतकऱ्यांची एस अॅग्रो फ्रेशचे संचालक व प्रतिनिधी यांनी संगनमताने निर्यातक्षम द्राक्षे खरेदी करुन सुमारे ६ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा वणी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.

येथील परशराम महादुु भोये, वय ६८ या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याकडून डि.पी.एस. ग्रुपचे दिपक ज्ञानदेव भोसले व प्रशांत ज्ञानदेव भोसले यांनी सन २०१२ पासून २०१४ पर्यंत तीन वर्ष नियमित निर्यातक्षम द्राक्ष खरेदी करुन श्री. भोये यांना पैसे दिले होते. सन २०१५ च्या हंगामातील द्राक्ष खरेदीसाठी भोसले बंधुंनी श्री. भोये यांच्याशी संपर्क साधुन त्यांचे मागील वर्षाचे खरेदी केलेल्या द्राक्षांचे बाकी असलेले ८७ हजार रुपये व माल खरेदीसाठी उगाऊ रक्कम म्हणून १३ हजार असे १ लाख रुपये रोख स्वरुपात देवून विश्वास संपादन केला. यावेळी श्री. भोये यांचे निर्यातक्षम असलेले द्राक्ष ६१ रुपये प्रतिकिलो असा भाव ठरवून २४ जाने २०१५ ते १ फेब्रुवारी २०१५ या दरम्यान ११, ६२१ किलोग्रॅम द्राक्षांची खरेदी केली होती. त्यावेळी सॅम्पल टेस्टिंगचे ४ हजार वजा करून खरेदी केल्या द्राक्षांचे ६ लाख ९५ हजार ८९८ इतकी रक्कम एक ते दीड महिन्यात देण्यात येईल असे सांगण्यात आले. यानंतर श्री. भोये यांनी बाकी असलेल्या पैशांचा तगादा लावल्यानंतर भोसले बंधुंनी इंडसइंड बँक पुणे या बँकेचा ७ लाख ४ हजार ८१८ या रक्कमेचा डी. पी. सेल्स कॉर्पोरेशन या नावाचे खाते असलेला २८ फेब्रुवारी १५ ही तारीख असलेला धनादेश दिला होता. यानंतर श्री. भोये यांनी सदरचा धनादेश बँक अॉफ महाराष्ट्र, वणी शाखेत वटविण्यासाठी दिला असता तो न वटता परत आला. यानंतर श्री. भोये यांनी भोसले बंधुशी संपर्क साधला असता वेगवेगळी कारणे देवून पैसे देण्यास टाळटाळ केली. यानंतर भोसले यांनी त्यांच्या मध्यस्तांमार्फत बी. एल. बँक शाखा पूणे या शाखेत डी. पी. सेल्स कॉर्पारेशन हे खाते नाव असलेला २६ फेब्रुवारी २०१८ या तारखेचा ५ लाख ४ हजार ८९८ रुपयांचा तसेच १० मार्च २०१८ ही तारीख असलेला १ लाख ८७ हजार ७८३ रुपयांचा धनादेश दिपक भोसले यांनी आपल्या सही करुन मिरचीचे पालखॆड येथील संतोष आहेर यांच्या मार्फत दिला. यावेळीही सदरचे धनादेश न वटल्याने डि. पी. एस अॅग्रो फ्रेशचे दिपक भोसले, प्रशांत भोसले, ज्ञानदेव भोसले तसेच त्यांचे भागीदार यांनी संगतमताने पैसे देण्यास टाळाटाळ करुन, विश्वासघात करुन फसवणूक केली म्हणून परशराम भोये यांनी ता. ३ रोजी वणी पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी डि. पी. सेल्स कार्पोरेशन व डी. पी. एस. अॅग्रो या फर्मचे संचालक व प्रतिनिधी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com