कंधार येथे चार वर्षीय मुलीवर अत्याचार

प्रल्हाद कांबळे
रविवार, 24 जून 2018

कंधार तालुक्यात चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

नांदेड - अंगणात खेळणाऱ्या एका चार वर्षीय बालिकेला उचलून नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका युवकावर अत्याचार व पोक्सो अंतर्गत कंधार ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
       
कंधार तालुक्यातील नारवटवाडी येथील एक बालिका शुक्रवारी (ता. २२) ही रात्री साडेनऊच्या सुमारास खेळत होती. घराशेजारी एका कार्यक्रमात आई व घरची मंडळी गेली होती. याचा फायदा या नराधम आरोपीने घेतला. रात्रीच तिचा शोध घेतला असता हा धक्कादायक प्रकार पुढे आला. परंतु मुसळधार पाऊस पडत असल्याने पिडीत बालिकेच्या पालकांनी शनिवारी (ता. २३) कंधार ठाणे गाठले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. आरोपी हा सुध्दा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले. तपास पोलिस उपनिरिक्षक राणी भोंडवे (बर्डे) या करीत आहेत. या किळसवाण्या घटनमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: sexual harassment of four year old girl in kandhar taluka