

Nandurbar News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १७५ वैध अर्जांपैकी गुरुवारी ११० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने माघारीअंती १८ जागांसाठी ६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (shahada Market Committee Election 65 candidates for 18 seats nandurbar news)
दरम्यान, या निवडणुकीत मातब्बर उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्याने निवडणूक चुरशीची होणार.
जिल्ह्यात एकमेव शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चार पॅनलमध्ये चौरंगी लढत होत असल्याने निवडणूक चांगलीच गाजणार आहे. त्यात भाजपचे प्रदेश सदस्य तथा सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पॅनल, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल,
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली, तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे परिवर्तन पॅनल व महाविकास आघाडीचे गणेश राजे पाटील व अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिवर्तन पॅनल असे चार पॅनल आहेत. निवडणुकीच्या रिंगणात मातब्बर असल्याने निवडणूक चांगलीच गाजणार आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवार संख्या अशी :
-सहकारी संस्था मतदारसंघ (सर्वसाधारण) : २४
-सहकारी संस्था मतदारसंघ (महिला राखीव) : ७
-सहकारी संस्था मतदारसंघ (इतर मागासवर्गीय) : ३
-सहकारी संस्था मतदारसंघ (भ. जाती जमाती/वि. जा.) : ३
-ग्रामपंचायत मतदारसंघ (सर्वसाधारण) : १०
-ग्रामपंचायत मतदारसंघ (अनुसूचित जाती-जमाती) : ४
-ग्रामपंचायत मतदारसंघ( आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक):३
-व्यापारी व आडत्यांचा मतदारसंघ :६
-हमाल व तोलारी मतदारसंघ ः ४
एकूण : ६५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.