Sarangkheda News : १ कोटी १७ लाखांची 'रुद्राणी'! सारंगखेडा यात्रेत या घोडीचीच चर्चा
Rudrani: The Star Attraction of Sarangkheda Horse Fair : शहादा येथील सारंगखेडा यात्रोत्सवात प्रदर्शनासाठी आणलेली, एक कोटी सतरा लाख रुपये किमतीची 'रुद्राणी' नावाची घोडी. तिची आकर्षक बांधणी, प्रभावी उंची आणि तिची खास निगा यामुळे ती अश्व शौकिनांसाठी यंदाचे मुख्य आकर्षण ठरली आहे.
शहादा: सारंगखेडा येथील यात्रोत्सवात दर वर्षी विविध जातीचे उमदे घोडे दाखल होतात. अश्व शौकिनांसाठी पर्वणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यात्रेत यंदा तब्बल एक कोटी १७ लाखांची रुद्राणी नावाची घोडी आकर्षण ठरली आहे.